Friday, February 1, 2013

देवाची भेट



काय हवे ते कळेना
कोण देई ते कळेना
कसे मागू ते कळेना
दिले का नाही कळेना  ....  जीव शांत होईना I १ I

अपुरेपणाची जाणीव
अर्धवट ज्ञानाची नेणीव
मी मीपणाची राणीव
समाधान काही होईना  ..... जीव शांत होईना इ I २ I

दुखः कसे ते सोसेना
सुखाची हौस भागेना
पाठलाग तो थांबेना
वाढावी संपत्ती दैना    .....   जीव शांत होईना  I  ३ I

किती करू समजावणी
कोणाची करू आळवणी
अनेक शंका अडचणी
थारा कसा तो लागेना   .......  जीव शांत  होईना  I ४ I

अवचित देव भेटला
बाल निरागस हासला
देव तेथे निहारला
आनंद फिरुनी गवसला ....... जीव  शांत जाहला I ५ I

देवाची भेट  झालीना झालीना झालीना

देवाची भेट झालीना झालीना झालीना