Tuesday, May 14, 2013




सुनित 

मी कोणाचा नाही म्हणुनी माझे कोणी नाही 
जे जे काही जग मी पाही माझे बनून राही !! १ !!

कितीक पात्रे कितीक गात्रे विमर्ष हर्ष कितीही 
काळ पुढती स्मृति मागुती कधी स्तब्ध कधी वाही !!२!!

गाणे , हसणे ,रडणे , चीडणे विभ्रम सारे  एक मी निर्मोही 
उठती, बसती, पसरत जाती, सर्व प्रवाह नी लाटाही  !!३!!

हर्ष खेद  नी येणे जाणे सोयर सुतक नाही 
रिकामाच मी तेवा होतो रिकामाच आताही !!४!!

इतके सारे कळूनही मजला नाहीच कळले  काही 
शेवट कळला म्हणुनी ना कळे कथा अशी लवलाही  !!५!!

कुणास  कळले कुणी शिकवले परंपरा कशी ही 
बदलूनी चेला गुरु  बदलूनी खेळ संपत नाही !!६!!

क्षणोक्षणी प्रश्न फिरवुनी सतत सताविते काही 
विचार  करुनी वा विचारूनही उत्तर येत नाही  !!७!!


ता : १ ४  मे २० १ ३ 
ठिकाण : ठाणे हेंल्थ केअर 
प्रसंग  : आईचे आजारपण