Wednesday, December 31, 2014

मी माझे मोहित

मी माझे मोहित  राहिले निवांत , एक रूप तत्व  देखिले गे माये ll १ ll 
द्वैताच्या भाषा हारपल्या , शेवटी विश्वरूपे मिठी देत हरि ll २ ll 
छाया माया काया  हरिरूपी ठाया , शेवटी विलया एक तेजी ll ३ ll 
ज्ञानदेवा पाहा  सोहं सोहं भावा , हरिरूपी दुहावा सर्व काळ ll ४ ll 

1 Oh Mom, I am left quiet and spell bound by watching my image as one and only principle. 

2 Expressions of dual reality are vanished. HARI has unified my image with that of the universe.

3 The delusion of my Body with its shadow is merged with the image of HARI as the light would merge with light.

4 Janadev suggests HARI is like a cow from whom the sense of  " I am That " should be milked incessantly.

Tuesday, December 30, 2014

TALIBAN BRAHMIN

TALIBAN BRAHMIN.

From the Times of India dated 29-12-2014.On page 16.

The Taherik-e-Taliban in a video released by it has purportedly shown senior commander ADNAN RASHID , a former Pakistan Air Force official who was involved in attack on on President Musharraf listing the atrocities committed by Army to include " Killing of millions" and " Raping of own sisters " during the Bangladesh Liberation War in 1971 continued to accuse Army officers as "Brahmins" treating their juniors as " Shudra ". Perhaps an unwitting admission of inheriting social system of enemy. Most unexpected quarters to use Hindu Indian social system to seek parallel with its own.

Coming from an organisation taking pride in destruction of Heritage site of Budhha Statues in Afganistan is irony in itself. This four tire social ladder with Brahmin at top and Shudra at bottom with Khsatriya and Vaishya in between dates back by several centuries before dawn of Budhhism era. Unfortunately the system is not stone statues craved in line from mountain that can be destructed with cannon balls. Merits and demerits of four tire social hirarchy is  matter to be dealt separately at length some other time. Suffice to draw attention to the fact that the system has shown enough resilience to last for several centuries and several dynasties and several rules.

Throws light on the mind sets of behavior between Officer and soldier not only Pakistan Army but almost every where in the world. Very recently the same paper carried an article lauding officers allowing use of Golf Ground to common soldiers and cheering them from side. ( Note not playing but just cheering ).

The names may differ but fact remains that no society has ever created order of equality not withstanding french revolution or communism. Who can forget wars between Kings and Popes for supremacy ?

So co-existing  of Taliban and Brahmin is really not out of order !!




Friday, December 12, 2014

ठेविले अनंते तैसेचि रहावे

हेचि थोर भक्ति आवडते देवा l संकल्पावी माया संसाराची ll १ ll 
ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान ll २ ll 
वाहिल्या उद्वेग दुखःची  केवळ l भोगणे ते मूळ संचिताचे ll ३ ll 
तुका म्हणे घालू तयावरी भार l वाहू हा संसार देवापाशी ll ४ ll 

तुकाराम महाराजांची  रचना " म्हण "  बनून  जाण्याचे अजून एक उदाहरण . 

 " ठेविले अनंते तैसेचि  राहावे  ". तमाम आळशी आणि कामचुकार माणसांनी बदनाम केलेले वचन . प्रत्यक्षात दुसरा अर्धा भाग अधिक महत्वाचा आहे हे सहसा ध्यानात घेतले जात नाही . " चित्ती असो द्यावे समाधान ".  कुठून येते हे चित्ताचे समाधान ?  यशाने ? धनाने ? किर्तीने ? क्षणिक समाधान कदाचित येतही असेल पण कायमचे समाधान मिळवण्याचा उपाय तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून सांगत आहेत. 
जे काही कर्म माणसाकडून होते त्याला काम किंवा इच्छा आणि त्या मिळवण्यासाठी काही करावे असा संकल्प असावा लागतो . ह्या इच्छा सर्वसामान्यपणे आपल्या वैयक्तिक आवडी निवडी नुसार स्फुरतात . भक्ति मधे हे स्फुरण अर्पण करण्याचे होते. पत्र पुष्प फल तोय असे जे काही भक्त देतो ते मी आवडीने घेतो असे भगवंत गीतेत सांगतात . मग  छोट्या मोठ्या गोष्टी अर्पण करण्या पेक्षा सर्व कामनांचा संकल्पच अर्पण केला तर ? मग संकल्प संसाराचा न राहता भक्तीचा बनून जतो. काही हवे असते तेंवा  ते तसे न होण्याचे भय असते . भक्तिरूप संकल्प भगवत्प्राप्तीशिवाय काहीच मागत नाही . ह्या पातळीवर चित्ताचे समाधान मिळते. सकाम संकल्प कामपुर्तीच्या समाधानाचा  क्षणिक अनुभव कदाचित देईल सुद्धा पण दुसरी इच्छा आणि दुसरा संकल्प स्फुरत नाही तोपर्यंतच . माणसाचे मूळ  स्वरूप शांती समाधान रुपीच आहे तथापि हव्यासापोटी अशांति उत्पन्न होते. ती यातायात संपली कि अपोआप काही करण्याचा संकल्प जाऊन ठेविले अनंते तैसेचि  राहण्यात चित्ताचे  समाधान मिळते . कारण अशांति आधी चित्तात म्हणजे  अंतकरणात उत्पन्न होते. 
संकल्प त्यागाशिवाय संचिताचे दुखः आणि उद्वेग अपरिहार्य म्हणून स्वीकारावा असे सांगायला महाराज विसरले नाही . त्यांचे चरित्र  बघितले तर संचिताचा खूप मोठा भोग भोगून सुद्धा ते संतपदापर्यंत पोचले हे दिसून येते. 



Saturday, December 6, 2014

SELFIE OF HOMAGE


Recent news : A fellow on whatsApp penned his own homage, posted it to friends and committed suicide. Very much like taking selfie picture to share.  Strange desire to communicate suicide wish. Usually those who threaten to commit suicide rarely do so. It is more for calling attention and sympathy.  We have law punishing those who attempt to commit suicide. Being true to word for suicide wish is rare of the rarest. The fellow perhaps deserved to be hanged had he failed in attempt and lived to face the trial. We have seen a another fellow  persuaded for hours not to jump in suicide bid. Promptly charged with suicidal crime book. What an irony where the success  grants escape and failure goes to grip of trial.

I am amused by selfie nature of homage. Those who are not sure of if and how their pictures will betaken shared with public resort to selfie type pictures and do publishing of such pictures themselves. Some times high profile leaders like Narendra Modi too fall for such temptation for no reason.  Born natural instinct of making own memories immortal.  Selfie type homage is like building tomb for your self as it was done in some dynasties like KUTUBSHAHI. The Emperor would not trust his heir/s for the job and take the task upon himself. We can see number of unfinished or just started tombs of short lived Emperors.  We also have examples of our great politicians behaving in same fashion and have named some streets or gardens after them while still alive.

It is another matter that such self created homages or name plates or even tombs have expiry date sooner or later. Let the departed soul feel happy about becoming immortal through such measures. RIP.

आलिया भोगासी असावे सादर l देवावरी भार घालूनिया ll १ ll 
मग तो कृपासिंधु निवारी साकडे l येर ते बापुडे काय  रंक ll २ ll 
भयाचिये पोटी दुख्खाचीया राशी l शरण देवासी जाता भले ll ३ ll 
तुका म्हणे नव्हे काय त्या करिता l चिंतावा तो आता विश्वंभर ll  ४ ll 


तुकारामांच्या ज्या रचनांना म्हणींचे रूप प्राप्त झाले आहे त्या पैकी ह्या अभंगाचा पहिला चरण आहे . अशी अनेक उदाहरणे दाखवता येतिल. 

सर्व सामान्य माणसे दुखः आणि पीडा यांनी त्रस्त झाली की  हा चरण म्हणतात . एक असहायता प्रगट करण्याची ही जणू रीतच झाली  आहे . प्रत्यक्षात तुकाराम  महाराज निराश न होण्यासाठी उपाय सांगत आहेत देवावर भार घातला की आपली सहनशक्ती वाढते . देवाशिवाय  अन्य कोणी दुखः निवारण करायला समर्थ नाही . देब परिस्थिति तरी बदलेल किंवा आहे ती परिस्थिति स्वीकारायचे सामर्थ्य देईल . देवाला शरण गेल्यावर तो कृपा करणारच कारण तो कृपासिंधु अहे. इतर म्हणे येर तेवढे शक्तिमान नाहीत म्हणून  बापुडे .  मुळात दुखः भयापोटी निर्माण होते. भय काहीतरी गमावण्याच्या शक्यतेमुळे निर्माण होते. मग ते धन असो मान असो व जीवित.  हे काहीही  आपले नसताना आपण ते आपले मानतो आणि गमावण्याची भीती बाळगतो . " सर्व काही देवाचे " हा भाव धरिला की देवाचे होते ते देवापाशी गेल्याची भीती कशाला ? भीती नाही तिथे दुखः नाही . 
तुकाराम महाराज म्हणतात की व्यर्थ काही न करता विश्वंभराचे  चिंतन करावे . " विश्वंभरे  विश्व सामावले पोटी  , तेथेच शेवटी आम्ही असु  " असे दुसरीकडे महाराजांनी सांगितले आहे . जगाचे कल्याण करतो तो आपलेही करणारच . आपण स्वतःच स्वतःचे कल्याण  काय हे ठरवायचे कशाला ? तो भार ज्याचा आहे त्याच्यावर ठेवावा म्हणजे  आपण मुक्त होऊन जाऊ . 

Monday, December 1, 2014

दिग्देशकालाद्यनपेक्ष्य सर्वगं शीतादिह्रुन्नित्यसुखं l 
यः स्वात्म्तीर्थ भजते विनिष्क्रियः स सर्ववित्सर्वगतोSमृतो भवेत् ll 
आत्मबोध शेवटचा श्लोक 
आदि शङ्कराचार्य ll 

मराठी काव्यरूप 

आता कुठे  जाणार नाही, जायला  कुठची दिशा  नाही l १l 
तरी कुठे  थांबणार नाही, कारण थांबण्याला  जागा नाही l २l 
उन पाऊस थंडी वारा , कशास थारा उरला नाही l ३l  
कसला डाग कसले  दुखः , सुखास पारावार नाही l ४l 
संकल्पाची उर्मि सरली , करू  काहीसे  उरले  नाही l५l 
मीच सर्वदूर फाकलो , सर्व कवेत घेउनी बसलो l६l  
मीच यात्रा मीच तीर्थ , मीच मजला गिळूनी बसलो l७l  
आता द्यानरूप झालो , आता मी अमृत झालो l ८l 
आता मी अमृत झालो, आता मी अमृत झालो ल l ९l