Monday, July 27, 2015

झोळी 
जीर्ण माझी झोळी देवा आर्ततेनी आणली रे l
रंग संग नि ढंग करिता दिवस रात्र गेली रे ll धृ ll 

मायबापे वस्त्रे दिधली जोडीत जोडी शिवली रे l 
आशा पाशे चिकटवली अस्तरे आत लाविली रे ll 
कधी ठिगळे कधी टाके माया धागे विणली रे II १ II 

रंग देवूनी झालरुनिया सजव सजव सजली रे I 
सुख दुख्खे भर भरुनी ताणत ताणत नेली रे II  
हाती खांदी वागवली डोईवर कधी घेतली रे II  २ II 

जिथे गेलो तिथे नेली क्षण एक न  विसरली रे I 
झोळी न माझी मी झोळीचा उरफाट कशी हि झाली रे II 
फाटली आणि उसवली  आणली करून खाली  रे II ३ II