Saturday, January 23, 2016

साधन हे सोपे

साधन हे सोपे  करून बघावे l 
बोले देवासवे आपुल्या स्वभावे ll १ll 

मनातील भ्रांत होईल निवांत l 
सारे खेद खंत देवा असे ठावे ll २ ll 

नको न्यायान्याय पाप आणि पुण्य l 
नको भिक राज्य सुखाने वर्तावे ll ३ ll 

नको गांजणूक नको आराणूक
नको गुंतणूक मोकळे असावे ll ४ ll 

सोबती सांगाती उच्चनीच जाती 
नको त्यांची ख्याति एकचि उरावे ll ५ ll 

आपण गोमटे जनहि गोमटे 
सकल गोमटे करूनी सरावे ll ६ ll 

मुख्य ते स्वहित थोडे  जनहित 
काही करू गत परत न यावे ll ७ ll 

थोडेसे कवित्व वाढवी महत्व 
कामा येई सत्व आता निरवावे ll ८ ll